Posts

चूल ते Modern Kitchen

Image
  चूल ते Modern Kitchen  काळ्याभोर शेतात लाकूड, माती आणि तणसानी बनवलेली ती छपराची घरं, सभोवताली मोठी , हिरवीगार निंबाची, बाभळीची झाडं,भलं मोठं आंगण.. अंगणात दगडाचं तुळशी वृंदावन आणि त्यात बहरलेली तुळस..  ह्या अशा सुंदर घरात एका बाजूला असायचं स्वयंपाक घरं . स्वच्छ शेणानी सारवलेलं, भिंती पांढऱ्या (शाडूची) माती ने पोतेरालेल्या, एका बाजूला असलेली चूल ती हि शाडूच्या मातीने लेपलेली . सारवणे, पोतेरा देणे, लेपने हे तेव्हाचे शब्द जे आताच्या पिढीला माहित नसावेत आणि आपली कदाचित शेवटची पिढी असेल असे शब्द माहिती असणारी. असो..  तर अश्या ह्या स्वयंपाक घरात एका बाजूला  मांडलेली चूल, त्याशेजारी व्यवस्तीत रचून ठेवलेलं सरपण (बऱ्याचदा ते काटेरी असायचं.  more precisely चिलारीचं जळन ). पाठीमागे असणार मोठं लाकडी कपाट आणि त्यात मांडून ठेवलेली मोठी लोखंडी आणि तांब्या पितळेची भांडी जस कि गोल आणि कडीचे डबे, हंडे, कळशी, पराती, चरवी, चंबू, गंज, खिसणी, लोखंडी किंवा बिडाचा (एक प्रकारचा धातू) तवा.. इत्यादी .  एका कोपऱ्यात बसवलेलं जातं , शेजारीच जमिनीत रोवलेलं उकळ...